पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 !-PM Internship 2025!

PM Internship 2025!

0

पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, पुढील पाच वर्षांत देशातील एक कोटी तरुणांना देशातील आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

PM Internship 2025!या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, त्याआधी अर्जदारांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांचे वय 21 ते 24 वर्षांदरम्यान असावे आणि ते कोणत्याही पूर्णवेळ शिक्षणक्रम किंवा नोकरीत असता कामा नये. उमेदवारांनी किमान दहावी/बारावी किंवा कोणताही पदवी/डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. IIT, IIM, NLU, IIIT अशा नामांकित संस्था आणि CA, MBA, MBBS, PhD अशा पदव्या घेतलेल्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करता येणार नाही.

नोंदणीसाठी उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरून अर्ज करायचा आहे. अर्ज करताना आधार कार्ड व शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज सादर केल्यानंतर पोर्टल उमेदवाराची CV तयार करून देईल. उमेदवार त्यांच्या पसंतीनुसार ५ इंटर्नशिप पर्याय निवडू शकतात. इंटर्नशिप कालावधी १२ महिन्यांचा असून, दर महिन्याला ₹५,००० मानधन मिळेल – त्यातील ₹५०० कंपनीकडून व ₹४,५०० सरकारकडून थेट बँक खात्यावर जमा केलं जाईल.

इंटर्नशिपमुळे नोकरीची हमी नसली तरी, कामगिरीनुसार उमेदवाराला संधी मिळू शकते. त्यातही विविध क्षेत्रांतील (IT, बँकिंग, फार्मा, मीडिया, कृषी, टेक्स्टाइल, टुरिझम इ.) आघाडीच्या कंपन्यांमध्ये अनुभव मिळेल – जसे की TCS, Reliance, ITC, Times Group आणि इतर. जर एखाद्या उमेदवाराने इंटर्नशिप मधेच सोडली, तर एक वर्षासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच, गुणवत्तेनुसार मूल्यांकनही केलं जाईल आणि प्रशंसापत्र/बक्षिसही दिलं जाऊ शकतं.

अर्ज करताना अडचण आल्यास 1800 11 6090 या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता किंवा pm**********@*****ov.in या ईमेलवर विचारणा करू शकता. ही योजना तरुणांना कौशल्य, अनुभव आणि करिअरची दिशा देण्यासाठी एक मोठी संधी आहे – ती गमावू नका!

Leave A Reply

Your email address will not be published.