लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे अनेक महिलांचा लाभ अडचणीत आला आहे. काही लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडल्याचे समोर आल्यानंतर, राज्य सरकारने आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती समाज माध्यमावरून दिली आहे. ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र योजनेचे संकेतस्थळ बंद असल्याने अनेक महिलांच्या नोंदी दुरुस्त होऊ शकल्या नाहीत. परिणामी वाशिमसह विविध जिल्ह्यांतील लाभार्थ्यांचे अनुदान थांबले आहे.
या प्रत्यक्ष पडताळणीत लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान आहे का, ती योजनेस पात्र आहे का, तसेच तिचा पती सरकारी कर्मचारी नाही ना, यासारख्या महत्त्वाच्या बाबी तपासल्या जाणार आहेत. या प्रक्रियेमुळे पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.