ईपीएफओ खातेदारांसाठी आनंदाची बातमी! येत्या एप्रिलपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफमधील रक्कम UPI च्या माध्यमातून काढण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे पीएफमधील ठराविक रक्कम शिल्लक ठेवून उर्वरित पैसे थेट खातेदाराच्या बँक खात्यात जमा होतील.
UPI पिनच्या साहाय्याने हा व्यवहार सुरक्षित व जलद असेल. पैसे खात्यात जमा झाल्यानंतर ते ATM, डेबिट कार्ड किंवा डिजिटल पेमेंट्ससाठी वापरता येतील. सध्या क्लेम अर्ज व मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी EPFO नव्या प्रणालीवर काम करत आहे.
आतापर्यंत ऑटो-अप्रूव्हल प्रक्रियेतून २ ते ३ दिवसांत पैसे जमा होत होते, तसेच काढण्याची मर्यादा १ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आजारपण, शिक्षण, लग्न व घरखरेदीसाठी पीएफमधून रक्कम काढता येते.
EPFO दरवर्षी सुमारे ५ कोटी दावे मंजूर करते. ऑक्टोबर 2025 मध्ये नियम सुलभ करत खात्यातील ७५% रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली असून २५% रक्कम खात्यात ठेवली जाते. पीएफ रकमेवर सध्या ८.२५% चक्रवाढ व्याज मिळते.

Comments are closed.