पवित्र पोर्टल सुरूच राहणार!-Pavitra Portal Won’t Shut!

Pavitra Portal Won’t Shut!

0

“पवित्र पोर्टल बंद होणार का?” — असा सवाल उपस्थित होताच शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत थेट स्पष्ट केलंय की, पवित्र पोर्टल बंद होणार नाही!

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी २०१७ पासून सुरु असलेलं हे पोर्टल सुरूच राहणार असून, त्यात आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत. पात्र पण उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांनाच संधी मिळावी यासाठी वेगवेगळ्या सुधारात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

यात नियुक्त उमेदवारांची नावे पोर्टलवरून हटवण्याचे आदेश लवकरच विभागाला दिले जातील. पारदर्शक आणि सुलभ भरतीसाठी संस्थाचालकांनाही सहकार्य करावं लागेल.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक मिळाले पाहिजेत,” ह्या उद्देशाने भरती प्रक्रियेला गती देण्याची तयारीही शिक्षण विभागाने दर्शवली आहे. म्हणजेच, भरती सुरूच राहणार पण आता आणखी पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीनं!

Leave A Reply

Your email address will not be published.