शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि एकसंध प्रणाली राबविण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे — शिक्षक भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत नोंदणी करावी, असे स्पष्ट आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केले आहे.

यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://tait2025.mahateacherrecruitment.org.in उपलब्ध करून देण्यात आले असून, पात्र उमेदवारांना याबाबत एसएमएसद्वारेही माहिती पाठवण्यात आली आहे.
टेट २०२४ च्या प्रक्रियेनंतर आता टेट २०२५ साठी पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाल्याने राज्यातील हजारो पात्र शिक्षक उमेदवारांना भरतीची संधी मिळणार आहे. शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल हेच एकमेव अधिकृत माध्यम असणार असून, या पोर्टलद्वारे संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या नोंदणीअंतर्गत उमेदवारांना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, TET/CTET तपशील तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे.
नोंदणी करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास पुढील टप्प्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सर्व तपशील अचूक आणि योग्य पद्धतीने भरण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.

Comments are closed.