पनवेलमध्ये पुन्हा भरतीची चाहूल!-Panvel Municipal Recruitment Return!

Panvel Municipal Recruitment Return!

महापालिकेनं १३४ रिक्त पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सप्टेंबरमध्ये शासनाकडून मुदतवाढ मागितलेला प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे मागे घ्यावा लागला होता. पण आता प्रशासनानं टीसीएस कंपनीमार्फत नव्याने भरती सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

Panvel Municipal Recruitment Return!या पदांमध्ये सर्वाधिक ७६ पदे लिपिक-टंकलेखकांची असून, त्यासोबत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, हार्डवेअर-नेटवर्किंग), वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अग्निशमन दलातील कर्मचारी, वाहनचालक, माळी आणि सहाय्यक क्रीडा अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे.

मागील भरतीवेळी अनेक उमेदवारांची निवड राज्यातील इतर विभागांत झाली होती. त्यामुळे पनवेलमधील पदांवर नियुक्ती असूनही काहींनी रुजू होणे टाळले. अनेक तरुणांनी आपल्या गावाजवळील नोकरीकडे झुकत निर्णय घेतला. त्यामुळे आता रिक्त पदांसाठी पुन्हा भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय.

उपायुक्त कैलास गावडे म्हणाले, “अनेक जागा अद्याप रिकाम्या आहेत. उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देऊन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल.”

या निर्णयामुळे पनवेल व परिसरातील असंख्य तरुणांच्या नोकरीच्या आशा पुन्हा उजळल्या आहेत.

Comments are closed.