भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाअंतर्गत कार्यरत कायदा व्यवहार विभाग (Department of Legal Affairs) यांनी देशभरातील कायद्याचे विद्यार्थी व पदवीधरांसाठी सशुल्क इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर केला आहे. या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाज, कायदेशीर संशोधन, संदर्भ काम, तसेच संविधान, प्रशासन, वित्त, पायाभूत सुविधा, कामगार, करार आणि मध्यस्थी कायदे यांसारख्या विविध क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी ३ वर्षांच्या कायदा अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी, ५ वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. संगणकाचे (MS Office, Infographics, Adobe इ.) चांगले ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
इंटर्नशिप कालावधी साधारणतः एक महिन्याचा असून दर महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सुरू होईल. निवडलेल्या उमेदवारांना नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरू येथील विभागीय कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल तसेच इंटर्नना ₹1000 मानधन देण्यात येईल.
अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. कायद्याची पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना NOC सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी (सायं. ५:००) आहे.

Comments are closed.