डुबे लॉ असोसिएट्स एलएलपी कडून सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ महिन्यांसाठी कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन इंटर्नशिप सुरू करण्यात आली आहे. ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विविध कायदेशीर क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी आखण्यात आली आहे.
या इंटर्नशिपमध्ये कंटेंट डेव्हलपमेंट, लेख आणि ब्लॉग लेखन, कायदेशीर संशोधन (SCC Online, Manupatra, Lexis+ यासारख्या डेटाबेसवर), न्यायालयीन निकालांचे विश्लेषण व ड्राफ्टिंग, तसेच वेबिनार्स व बिझनेस डेव्हलपमेंट उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. ही संधी कायदा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कौशल्य वाढवण्याकरिता खूप उपयुक्त ठरेल.
इंटर्नशिपसाठी दररोज किमान ६ तास, आठवड्यातून ५ दिवस काम करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडे प्रीमियम कायदेशीर संशोधन प्लॅटफॉर्मचा (जसं की SCC Online, Lexis+, इ.) वापर करण्याची सुविधा असणं अनिवार्य आहे.
ही इंटर्नशिप वर्क फ्रॉम होम पद्धतीने असेल आणि कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला ₹३,००० किंवा त्याहून अधिक मानधन दिलं जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला CV आणि अर्ज ca****@**la.in या ई-मेलवर पाठवावा.
Subject line मध्ये लिहा: Application for Virtual Internship for the Month of September 2025

Comments are closed.