तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये अप्रेंटिस म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. देशभरातील २५ कार्यस्थळांवर एकूण २,६२३ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना १६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

‘महारत्न’ दर्जाची ही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारतात आणि विदेशात तेल- वायू शोध, उत्पादन आणि वितरण क्षेत्रात अग्रस्थानी आहे. या भरतीत फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह अशा विविध ट्रेड्समध्ये पदे उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून कोणतेही कागदी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज www.apprenticeshipindia.gov.in किंवा nats.education.gov.in या संकेतस्थळांवर करता येतील.
भरती केंद्रे उत्तर (देहरादून, दिल्ली, जोधपूर), मुंबई (मुंबई, उरण), पश्चिम (वडोदरा, अंकलेश्वर, कंबाय), मध्य (कोलकाता, बोकारो, आगरताळा) आणि दक्षिण (चेन्नई, काकीनाडा, कराईकल, राजमहेंद्री) या क्षेत्रांमध्ये आहेत. वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे (६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत) असून, SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC ला ३ वर्षे व PwBD ला १० वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवार त्या कार्यस्थळाशी संबंधित जिल्ह्यातील रहिवासी किंवा पात्रता मिळवलेले असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता म्हणून तांत्रिक पदांसाठी ITI प्रमाणपत्र, अकाउंट्स/सिव्हिल एक्झिक्युटिव्हसाठी कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग पदवी आणि लायब्ररी असिस्टंटसाठी १०वी उत्तीर्णता आवश्यक आहे.
दरमहा स्टायपेंड पदवीधर अप्रेंटिससाठी ₹१२,३००, डिप्लोमा धारकांसाठी ₹१०,९००, १०वी/१२वी उत्तीर्णांसाठी ₹८,२००, १ वर्ष ITI साठी ₹९,६०० आणि २ वर्ष ITI साठी ₹१०,५६० इतका राहील. प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिने असेल.
निवड प्रक्रिया पूर्णतः गुणांवर आधारित असेल; कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. समान गुण मिळाल्यास ज्येष्ठ उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. पूर्वी अप्रेंटिसशिप केलेल्या किंवा सध्या अप्रेंटिस असलेल्या उमेदवारांना पात्र मानले जाणार नाही.
अर्जाची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२५ असून, एकूण २,६२३ पदांसाठी अप्रेंटिसशिप (१ वर्ष प्रशिक्षण) ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात तपासून वेळेत अर्ज करावा.

Comments are closed.