वस्ती शिक्षकांना जुनी पेन्शन योजना!-Old Pension for Wasti Teachers!

Old Pension for Wasti Teachers!

वस्ती शाळांमधील शिक्षकांसाठी शासन स्तरावर जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार अभिमन्यू पवार आणि राहुल कुल यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.

Old Pension for Wasti Teachers!

शासनाने वस्ती शाळांमधील शिक्षण खंडित होऊ नये म्हणून कंत्राटी स्वरूपात स्वयंसेवक / निमशिक्षकांची नियुक्ती केली होती. १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार या शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले. आता या शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या दिशेने गंभीर विचार सुरू असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, आणि वस्ती शाळा शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री भुसे म्हणाले, “या शिक्षकांनी समाजासाठी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी लवकरच चर्चा होईल.”

या निर्णयामुळे वस्ती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Comments are closed.