सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) कडून भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही भरती ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C गटांमध्ये करण्यात येणार असून एकूण १०२ पदे भरण्यात येणार आहेत. देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीत काम करण्याची संधी तरुणांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती होणार?
या भरती अंतर्गत विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अधीक्षक अभियंता (३ पदे), वरिष्ठ अधिकारी (९७ पदे), गोपनीय सचिव (१ पद) आणि हिंदी अधिकारी (१ पद) यांचा समावेश आहे. तांत्रिक तसेच प्रशासकीय पदांसाठी संधी उपलब्ध होत असल्याने विविध शाखांतील उमेदवारांना यातून लाभ होणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
भरतीसाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. अभियांत्रिकी (Engineering), वित्त (Finance), एचआर (HR), आयटी (IT), कायदा (Law) किंवा भूगर्भशास्त्र (Geology) विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. त्याशिवाय काही पदांसाठी ICAI, ICSI, MBA किंवा PGDM सारख्या व्यावसायिक पदव्या अनिवार्य ठरवल्या आहेत. म्हणजेच, विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
वयोमर्यादेतील महत्वाचे नियम
या भरतीसाठी वेगवेगळ्या गटांनुसार वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. ग्रेड C साठी ३७ वर्षे, ग्रेड B साठी ३४ वर्षे आणि ग्रेड A साठी ४२ वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. मात्र, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC उमेदवारांना ३ वर्षे, अपंग उमेदवारांना १० वर्षे आणि माजी सैनिकांना ५ वर्षांची सूट मिळेल.
अर्ज शुल्क किती भरावे लागेल?
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शुल्क भरावे लागेल. सामान्य आणि OBC (Non-Creamy Layer) प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क ₹५०० + जीएसटी इतके आहे. मात्र, SC, ST, PwBD, EWS व माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज मोफत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचण नसल्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार सहज अर्ज करू शकतात.
पगार संरचना – लाखोंमध्ये वेतन
ऑइल इंडिया लिमिटेडकडून मिळणारे वेतन ही या भरतीची सर्वात मोठी आकर्षण आहे. ग्रेड A पदांसाठी ₹५०,००० ते ₹१.६ लाख, ग्रेड B पदांसाठी ₹६०,००० ते ₹१.८ लाख आणि ग्रेड C पदांसाठी ₹८०,००० ते ₹२.२ लाख प्रतिमहिना इतके पगारमान निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जातील.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत होणार आहे. प्रथम कंप्युटर आधारित परीक्षा (CBT) घेण्यात येईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांची मुलाखत (Interview) घेतली जाईल. या दोन्ही टप्प्यांत यश मिळाल्यावर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. त्यामुळे अर्जदारांनी तयारीला लागणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया – कुठे करायचा अर्ज?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. वेळेत अर्ज पूर्ण न केल्यास संधी हातची जाऊ शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

Comments are closed.