राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण सेवा गट-अ मधील १० शिक्षण अधिकाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक किंवा समकक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत पदोन्नत केले गेले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कैलास दातखीळ यांना विभागीय शिक्षण उपसंचालक, पुण्यातील दीपक माळी यांना सचिव पदावर, तेजराव काळे यांना शिक्षण आयुक्त कार्यालयात, पुष्पावती पाटील यांना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
याचप्रमाणे, स्मिता गौड, भावना राजनोर, प्रिया शिंदे, प्रभावती कोळेकर, एकनाथ अंबोकर यांनाही विविध शिक्षण कार्यालयांमध्ये तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे.
सर्व पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमित पदोन्नती किंवा सेवाज्येष्ठतेचा हक्क मिळणार नाही. तसेच, ज्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग किंवा फौजदारी/चौकशी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांना पदस्थापनेसह पदोन्नती मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे

Comments are closed.