इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) या भारत सरकारच्या नवरत्न कंपनीत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल २०२६ आहे. एकूण ५९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांना ६०,००० ते १,८०,००० रुपये मासिक वेतन मिळणार असून वार्षिक सुमारे २१ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज दिले जाणार आहे. याशिवाय विविध भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे. उमेदवारांची निवड GATE 2026 स्कोअरच्या आधारे केली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग व ग्रुप डिस्कशनद्वारे अंतिम निवड केली जाईल. निवड झाल्यानंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असेल.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई., बी.टेक किंवा बीएससी (इंजिनियरिंग) पदवी घेतलेली असावी. तसेच GATE 2026 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित शाखेनुसार केमिकल, मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराचे वय २५ वर्षांपर्यंत असावे, तर राखीव प्रवर्गाला शासकीय नियमानुसार सूट मिळेल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी engineersindia.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Recruitment of Management Trainees” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन नोंदणी करून लॉगिन करावे, आवश्यक माहिती भरावी, शैक्षणिक कागदपत्रे व मोबाईल नंबर अपलोड करावा आणि अर्ज सबमिट करावा. अर्जाचा प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. ही संधी सरकारी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या अभियंत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Comments are closed.