आता शिक्षण थांबणार नाही!-No Barriers to Learning!

No Barriers to Learning!

इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबवली जातिये. ह्या योजनेखाली प्रोफेशनल आणि नॉन-प्रोफेशनल अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलांना दरवर्षी ५१ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार हाय.

No Barriers to Learning!ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालय, आणि १७ ऑगस्ट ही शेवटची तारीख हाय अर्ज भरायची.

ही योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जात असून, महापालिका, जिल्हा, आणि तालुका पातळीवरच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळणार हाय.

अर्जासाठी https://hmas.mahait.org या वेबसाईटवर १७ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार हाय, अशी माहिती सहाय्यक आयुक्त संतोष चव्हाण यांनी दिली.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी, जे विद्यार्थी १२वीत किमान ६०% मार्क घेऊन, केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतून कॉलेजात प्रवेश घेतलाय आणि ज्यांना सरकारी वसतिगृह मिळालं नाही, अशा ६०० विद्यार्थ्यांना ही योजना लागू होणार हाय.

लाभ घेण्यासाठी अटी:

  • पालकांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावं.

  • विद्यार्थ्याचं वय ३० वर्षांखाली असावं.

  • ७५% हजेरी अनिवार्य हाय.

लाभाचं विवरण:

शहर / जिल्हा पातळीवर:

  • भोजन भत्ता – ₹२८,०००

  • निवास भत्ता – ₹१५,०००

  • निर्वाह भत्ता – ₹८,०००

  • एकूण – ₹५१,०००

तालुका पातळीवर:

  • भोजन भत्ता – ₹२३,०००

  • निवास भत्ता – ₹१०,०००

  • निर्वाह भत्ता – ₹५,०००

  • एकूण – ₹३८,०००

अधिक माहितीसाठी – सामाजिक न्याय भवन, नासर्डी पूल, नाशिक येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाशी संपर्क साधावा.

Comments are closed.