‘लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी हप्ता अग्रिम नको! निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश! | No Advance January Installment: Commission Order!

No Advance January Installment: Commission Order!

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम स्वरूपात देण्यास स्पष्ट मनाई केली असून, यामुळे चर्चेत असलेल्या मकरसंक्रांतीच्या “मोठ्या भेटी”च्या घोषणांना ब्रेक लागला आहे.

No Advance January Installment: Commission Order!

लाडक्या बहिणींच्या खात्यात १४ जानेवारीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे एकत्रित ३,००० रुपये जमा होतील, अशा स्वरूपाच्या घोषणा झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या घोषणांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयोगाने सरकारकडे स्पष्टीकरण मागवले होते आणि या संदर्भात मुख्य सचिवांना पत्र पाठवले होते.

राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर २०२५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजना व विकासकामे आचारसंहिता काळात सुरू ठेवता येतात, अशी माहिती मुख्य सचिवांनी आयोगाला दिली होती.

ही बाब लक्षात घेऊन आयोगाने स्पष्ट केले आहे की योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, मात्र जानेवारीचा हप्ता अग्रिम स्वरूपात देणे शक्य नाही. तसेच, नवीन लाभार्थी निवडण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक काळात कोणताही गैरसमज किंवा आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी आयोगाने ठाम भूमिका घेतली आहे.

Comments are closed.