एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची महत्त्वाची अपडेट! हॉलतिकीट उपलब्ध, विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीची अंतिम तारीख जाहीर! | NMMS hall ticket out, correction deadline announced!

NMMS hall ticket out, correction deadline announced!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या रविवारी (२८ डिसेंबर) घेण्यात येणाऱ्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट परिषदेतर्फे www.mscepune.in आणि https://mscerumms.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यातील तब्बल १३,७८९ शाळांमधील २,५०,५४४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून परीक्षा ७५८ केंद्रांवर होणार आहे.

NMMS hall ticket out, correction deadline announced!

हॉलतिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटामधील नाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, आडनावातील स्पेलिंग, तसेच जन्मतारीख, जात, आधार क्रमांक या माहितीमध्ये त्रुटी असल्यास, त्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत शाळेच्या लॉगिनमधून ऑनलाइन दुरुस्ती अर्ज उपलब्द आहे.

महत्वाचे म्हणजे —

  • पूर्ण नाव बदलण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाही.
  • ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त टपाल, ईमेल किंवा समक्ष दिलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत.
  • ठरलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • सर्व दुरुस्त्या परीक्षा संपल्यानंतर केल्या जाणार आहेत.

राज्य परीक्षा परिषदेने दिलेली ही सूचना विद्यार्थ्यांनी व पालकांनी नीट लक्षात घेऊन वेळेत दुरुस्तीprocess पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.