एनएमएमएस परीक्षा २८ डिसेंबरला!-NMMS Exam on Dec 28!

NMMS Exam on Dec 28!

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) अंतर्गत परीक्षा २८ डिसेंबर रोजी राज्यभर घेतली जाणार आहे.

NMMS Exam on Dec 28!या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, परीक्षा परिषदेने प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत.

नोंदणीकृत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे. प्रवेशपत्रातील तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास, मुख्याध्यापकांच्या लॉगइनमधून २७ डिसेंबरपर्यंत बदल अर्ज करता येणार आहे.

या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरमहा १,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षा बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी अशा दोन पेपरची असून, प्रत्येकी ९० गुण आहेत.

सकाळी १०.३० ते १२.०० आणि दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत परीक्षा होईल. शिष्यवृत्तीसाठी खुल्या प्रवर्गात ४०% तर राखीव प्रवर्गात ३२% गुण मिळवणे आवश्यक आहे.

Comments are closed.