सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नाशिक महापालिकेकडून मोठी संधी जाहीर करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने एकूण ३४६ पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
या भरतीमध्ये तांत्रिक संवर्गातील ११४ पदांसह अग्निशमन विभागातील १८६ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये फायरमनच्या १५० आणि यंत्रचालक-वाहनचालकांच्या ३६ पदांचा समावेश आहे.
ही भरती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून १० नोव्हेंबरपासून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अधिकृत संकेतस्थळ https://nmc.gov.in येथे सर्व माहिती उपलब्ध आहे.
महापालिकेचा आस्थापना खर्च ४५ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे पदभरतीस पूर्वी मान्यता मिळत नव्हती. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजाची गती लक्षात घेऊन शासनाने ही अट शिथिल करून भरतीला हिरवा कंदील दिला आहे.
या भरतीमुळे फायर ब्रिगेड आणि तांत्रिक विभागातील कार्यक्षमता वाढणार असून, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे

Comments are closed.