निती आयोगात इंटर्नशिपची सुवर्णसंधी! अर्जाची अंतिम तारीख – १० सप्टेंबर! | NITI Aayog Internship Alert!

NITI Aayog Internship Alert!

भारत सरकारचा सर्वोच्च पब्लिक पॉलिसी थिंक टॅंक म्हणजे निती आयोग. आर्थिक विकासाला गती देणे, सहकारी संघराज्याला प्रोत्साहन देणे आणि राज्य सरकारांना धोरणनिर्मितीत सहभागी करून घेणे ही यंत्रणेची मुख्य जबाबदारी आहे. तळागाळातून वरच्या स्तरापर्यंत धोरणनिर्मिती करण्याची ही संस्था देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

NITI Aayog Internship Alert!

इंटर्नशिप योजनेचा परिचय
निती आयोगाने २०१५ मध्ये इंटर्नशिप योजना सुरू केली. या माध्यमातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या महत्त्वाच्या धोरणात्मक कामकाजात प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते. ही इंटर्नशिप किमान ६ आठवडे आणि जास्तीत जास्त ६ महिने एवढ्या कालावधीसाठी दिली जाते.

कोण अर्ज करू शकतात?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

  • पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी : दुसऱ्या वर्षाचे/चौथ्या सत्राचे परीक्षार्थी असावेत व १२वीत किमान ८५% गुण असावेत.
  • पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधक : पहिल्या वर्षाची/दुसऱ्या सत्राची परीक्षा दिलेली असावी व पदवीत किमान ७०% गुण असावेत.
  • अलीकडेच पदवी/पदव्युत्तर पूर्ण केलेले विद्यार्थी : पुढील शिक्षणाची वाट पाहत असलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात, परंतु त्यांनी एकूण गुणांमध्ये ७०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.

इंटर्नशिपची अट
अंतिम परीक्षा झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर निकाल जून महिन्यात लागला तर डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. ही अट पाळली नाही तर अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२५ पर्यंत निती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फक्त ऑनलाइन अर्ज करावा.

  • अर्ज इंटर्नशिप सुरू होण्याच्या ६ महिने आधी आणि किमान २ महिने आधीपर्यंतच करता येईल.
  • अर्ज करताना आपले Area of Interest स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे
निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप सुरू करताना कॉलेज/संस्थेकडून दिलेले NOC आणि मूळ गुणपत्रिका दाखवावी लागतील. अन्यथा अर्ज रद्द होईल. (अधिकृत अधिसूचनेतील Annexure ‘C’ प्रमाणे फॉर्म आवश्यक आहे.)

महत्त्वाच्या सूचना

  • एका आर्थिक वर्षात उमेदवार फक्त एकदाच इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो.
  • निवड झाल्यानंतर वेळेत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • सविस्तर मार्गदर्शक सूचना निती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

संपर्कासाठी
कुठलीही शंका असल्यास ni******@*ov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

Comments are closed.