नीती आयोग इंटर्नशिप २०२६: कायदा, कृषी, अर्थशास्त्र, अभियांत्रिकीसह UG-PG विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! | NITI Aayog Internship 2026 for UG-PG Students!

NITI Aayog Internship 2026 for UG-PG Students!

नीती आयोग (NITI Aayog – National Institution for Transforming India) ही भारत सरकारची प्रमुख धोरणात्मक विचारसंस्था (Think Tank) असून आर्थिक, सामाजिक व तांत्रिक विषयांवर केंद्र सरकारला मार्गदर्शन करते. नीती आयोग इंटर्नशिप योजना २०२६ अंतर्गत UG, PG तसेच रिसर्च/PhD विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

NITI Aayog Internship 2026 for UG-PG Students!

नीती आयोग इंटर्नशिप २०२६ साठी पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी बॅचलर डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाची किंवा चौथ्या सेमिस्टरची परीक्षा दिलेली/उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यांना बारावीत किमान ८५% गुण असणे बंधनकारक आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी PG च्या पहिल्या वर्षाची किंवा दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा दिलेली/उत्तीर्ण असलेले किंवा रिसर्च/PhD करत असलेले असावेत आणि त्यांना पदवीत किमान ७०% गुण असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम परीक्षा दिलेले किंवा नुकतीच पदवी/PG पूर्ण केलेले आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची वाट पाहणारे विद्यार्थीही पात्र आहेत, मात्र त्यांनी आजपर्यंतच्या सर्व सेमिस्टरमध्ये एकत्रितपणे ७०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असणे गरजेचे आहे.

या इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया ०१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून १० जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इंटर्नशिपचा कालावधी किमान ६ आठवडे आणि कमाल ६ महिने इतका असेल. ठरवलेला कालावधी पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

नीती आयोग इंटर्नशिपअंतर्गत विद्यार्थ्यांना कायदा, कृषी, अर्थशास्त्र, शिक्षण व HRD, ऊर्जा, परराष्ट्र व्यापार, प्रशासन, आरोग्य-पोषण व महिला-बालविकास, उद्योग, पायाभूत सुविधा, जनसंपर्क व सोशल मीडिया, खाण उद्योग, पर्यावरण व वन, प्रकल्प मूल्यमापन व व्यवस्थापन, सार्वजनिक वित्त, PPP, ग्रामीण विकास व SDGs, विज्ञान व तंत्रज्ञान, कौशल्य विकास व रोजगार, सामाजिक न्याय व सक्षमीकरण, क्रीडा व युवक विकास, पर्यटन व संस्कृती, स्मार्ट सिटी/नागरीकरण, जलसंपदा, LiFE (Lifestyle for Environment) तसेच विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रम अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी नीती आयोगाच्या अधिकृत इंटर्नशिप पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असून अर्ज करताना डोमेनची योग्य निवड करून शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. सरकारी धोरणनिर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची ही एक अत्यंत मौल्यवान संधी असून, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या राष्ट्रीय स्तरावरील इंटर्नशिपचा लाभ घ्यावा.

Comments are closed.