महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे. National Indian Military College (NIMC), डेहराडून (उत्तराखंड) येथे इयत्ता आठवीत प्रवेशासाठी घेतली जाणारी पात्रता परीक्षा ७ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी मुले आणि मुली दोघेही पात्र असून अर्ज करू शकतात, अशी माहिती Maharashtra State Examination Council यांनी दिली आहे.
या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवार १ जानेवारी २०२७ रोजी इयत्ता सातवीत शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. उमेदवाराची वयोमर्यादा ११ वर्षे ६ महिने ते १३ वर्षे इतकी असून २ जानेवारी २०१४ ते १ जुलै २०१५ दरम्यान जन्म झालेला असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे करता येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹600, तर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी ₹555 इतके आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक राहील.
पूर्ण भरलेले अर्ज ५ एप्रिल २०२६ पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, Pune येथे स्पीड पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जमा करावेत. अर्ज थेट डेहराडून येथे पाठवू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in ला भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त महेश चोथे यांनी केले आहे.

Comments are closed.