एनएचपीसीमध्ये सुवर्णसंधी – ३६० हून अधिक पदांसाठी भरती! | NHPC Mega Recruitment – 360+ Posts!

NHPC Mega Recruitment – 360+ Posts!

सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एनएचपीसी (NHPC) कडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०२५ आहे. यानंतर सादर करण्यात आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणं आवश्यक आहे.

NHPC Mega Recruitment – 360+ Posts!

एनएचपीसीने विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरतीत समाविष्ट पदांची माहिती पुढीलप्रमाणे – सहाय्यक राजभाषा अधिकारी – ११ पदे, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) – १०९ पदे, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – ४६ पदे, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) – ४९ पदे, कनिष्ठ अभियंता (ई & सी) – १७ पदे, वरिष्ठ लेखापाल – १० पदे, पर्यवेक्षक (आयटी) – १ पद, हिंदी अनुवादक – ५ पदे. त्यामुळे तांत्रिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.

उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) किंवा लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान ४०% गुण आवश्यक आहेत, तर एससी, एसटी आणि पीडब्लूबीडी उमेदवारांना ३५% गुणांची अट ठेवली आहे. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना गुणांच्या आधारे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल. ही प्रक्रिया फरीदाबाद येथील एनएचपीसी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पार पडेल.

परीक्षेचं स्वरूपही जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षा एकूण २०० गुणांची असेल. कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ लेखापाल पदांसाठी पेपर तीन भागांमध्ये विभागलेला असेल. एकूण १४० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण दिला जाईल, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

या भरतीसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) व जमाती (ST) – ५ वर्षे सूट, ओबीसी उमेदवार – ३ वर्षे सूट, दिव्यांग उमेदवार (PwBD) – १० वर्षे सूट.

एनएचपीसीकडून दिल्या जाणाऱ्या पगाराची रचना आकर्षक आहे. सहाय्यक राजभाषा अधिकारी – ₹४०,००० ते ₹१,४०,०००, कनिष्ठ अभियंता – ₹२९,६०० ते ₹१,१९,५००, पर्यवेक्षक – ₹२९,६०० ते ₹१,१९,५००, वरिष्ठ लेखापाल – ₹२९,६०० ते ₹१,१९,५००, हिंदी अनुवादक – ₹२७,००० ते ₹१,०५,०००. याशिवाय इतर भत्ते व सुविधा देखील मिळतील.

इच्छुक उमेदवारांनी एनएचपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.

एनएचपीसीची ही भरती तांत्रिक तसेच प्रशासनिक पदांसाठी मोठ्या संख्येने रोजगार संधी उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, अर्ज प्रक्रिया सुरु होताच उशीर न करता अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.

Comments are closed.