सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत विकास संस्थांपैकी एक असलेल्या नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये ३५० हून अधिक अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अप्रेंटिसशिपमधून उमेदवारांना काम शिकण्याची संधी तर मिळेलच, पण दरमहा स्टायपेंड देखील मिळणार आहे.

अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.nhpcindia.com वर जाऊन अर्ज सादर करावा. यामध्ये ITI, डिप्लोमा, पदवीधर, MBA, LLB, B.Com, MA, पत्रकारिता, फिजिओथेरपी व नर्सिंग यांसारख्या विविध पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना संधी आहे.
शैक्षणिक पात्रता पाहता, पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये BE/B.Tech/बीएससी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय MBA, B.Com, LLB, MA, MSW, बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपिस्ट असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. डिप्लोमा अप्रेंटिससाठी डिप्लोमा आणि ITI पदांसाठी संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट मिळणार आहे. त्यामुळे सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी संधीचं सोने करण्याची तयारी ठेवावी.
निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व गुणाधारित आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित केली जाणार आहे. म्हणजेच BE/B.Tech/ITI/डिप्लोमा/१०वी/१२वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, हे या संधीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे.
प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असणार आहे. यामध्ये उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. ITI उमेदवारांनी NAPS पोर्टलवर, तर पदवीधर व डिप्लोमा उमेदवारांनी NATS पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. याशिवाय भरतीविषयी अधिक माहिती NHPC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ही संधी केवळ नोकरी मिळवण्याची नाही, तर एक उत्तम शासकीय अनुभव घेण्याची आहे. जे उमेदवार सरकारी क्षेत्रात आपलं भविष्य पाहतात, त्यांच्यासाठी ही भरती म्हणजे एक पायरी पुढे जाण्याची संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.
सूचना : सदर माहिती सामान्य जनतेसाठी देण्यात आलेली असून, अधिकृत निर्णयासाठी NHPC च्या वेबसाइटला भेट देणे किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Comments are closed.