महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची सुवर्णसंधी! राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मुंबई अंतर्गत ‘समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी)’ पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे.

एकूण १,९७४ पदे भरण्यात येणार असून, विविध प्रवर्गांनुसार आरक्षण लागू आहे. महिलांसाठी ३०%, माजी सैनिकांसाठी १५%, खेळाडू, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी अनुक्रमे ५% आणि २% आरक्षण असेल. तसेच अपंग उमेदवारांसाठी ४% व अनाथांसाठी १% जागा राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता:
- बीएएमएस / बीयूएमएस / बी.एस्सी. (नर्सिंग) / बी.एस्सी. (कम्युनिटी हेल्थ) पदवी आवश्यक.
- संबंधित उमेदवारांनी ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
- नोंदणी प्रमाणपत्र (NMC/MCIIM किंवा Nursing Council) अर्जासोबत अपलोड करणे बंधनकारक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
वयोमर्यादा (४ डिसेंबर २०२५ रोजीप्रमाणे):
- खुला प्रवर्ग: ३८ वर्षांपर्यंत
- मागासवर्गीय / खेळाडू / अनाथ: ४३ वर्षांपर्यंत
- अपंग / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त: ४५ वर्षांपर्यंत
- अंशकालीन उमेदवार: ५५ वर्षांपर्यंत
निवड पद्धती:
- संगणकाधारित वस्तुनिष्ठ परीक्षा (CBT) — एकूण १०० गुणांची.
- चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू.
- सामान्य ज्ञान – २० गुण, NHM संबंधित विषय – ८० गुण.
- परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांत घेतली जाईल.
- पात्रतेसाठी किमान ४५ गुण मिळविणे आवश्यक.
- परीक्षा तारीख व निकाल https://hhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
अर्जाची पद्धत:
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ नोव्हेंबर २०२५
संकेतस्थळ: https://hhm.maharashtra.gov.in
ही भरती ग्रामीण आणि शहरी आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Comments are closed.