मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ३१ डिसेंबर रोजी सरकारने १५०० रुपयांचा हप्ता जारी केला असून, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते.
यंदा नवीन वर्षाच्या आधीच हप्ता मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. सुरुवातीला ही रक्कम जानेवारीत मिळेल अशी चर्चा होती; मात्र सरकारने थर्टी फर्स्टलाच पैसे वर्ग करून महिलांना सुखद धक्का दिला.
दरम्यान, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्यांनी अद्याप केवायसी केली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही, तसेच भविष्यात योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे. सध्या सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यांपैकी १.६ कोटी महिलांनी केवायसी पूर्ण केली असून, उर्वरित महिलांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे बचत गटांमार्फत ३ ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय. यामुळे महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना मिळून लघुउद्योगांना बळ मिळणार आहे.

Comments are closed.