तलाठी भरती 2025 — डिसेंबरअखेर राज्यात १,७०० पेक्षा जास्त पदे भरली जाणार! | 1,700 New Talathi Posts in Maharashtra!

1,700 New Talathi Posts in Maharashtra!

राज्यात महसूल विभागातील तलाठी पदांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत १,७०० पेक्षा जास्त तलाठी पदे भरली जाण्याची शक्यता असून, या भरतीमुळे महसूल प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार आहे.

1,700 New Talathi Posts in Maharashtra!

सध्या अनेक जिल्ह्यांत तलाठींच्या हजारो जागा रिक्त असल्याने एका तलाठ्याकडे ३ ते ४ गावांचा कारभार आहे. यामुळे नागरिकांची कामे विलंबाने होत आहेत आणि महसूल कामकाजावर ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील १७ रिक्त पदे भरली जाण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भरती झाल्यानंतर तलाठी कार्यालयांवरील कामाचा भार हलका होईल, तसेच नागरिकांना तत्काळ सेवा मिळू शकेल. भूमी नोंदणी, फेरफार, ई-हक्क नकल आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगाने पार पडतील.

बीड जिल्ह्यात तलाठ्यांची ९२९ मंजूर पदे असून त्यापैकी ९१२ तलाठी कार्यरत, तर १७ पदे रिक्त आहेत. ‘पेसा’ योजनेअंतर्गत १५ पदे मंजूर असून, त्यातील १३ पदे कंत्राटी पद्धतीने भरली गेली आहेत, तर २ अजून रिक्त आहेत.

तलाठी भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होणार असून, परीक्षेच्या व इतर महत्त्वाच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

या भरतीमुळे महसूल विभागातील ताण कमी होऊन ग्रामस्तरावर प्रशासन अधिक कार्यक्षम व पारदर्शक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.