मोठी बातमी !! सप्टेंबरपासून बदलणार आर्थिक नियम!-New Rules from September!
New Rules from September!
दर महिन्यासारखंच, सप्टेंबरपासून काही महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत, जे थेट आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करणार आहेत. यामध्ये आयकर रिटर्न भरण्याची डेडलाईन, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना, डाक विभागातील नविन व्यवस्था, क्रेडिट कार्डसंबंधी बदल, तसेच एलपीजी, सीएनजी आणि जेट फ्युएलच्या दरांमधील बदल यांचा समावेश आहे. चला पाहूया काय काय बदलणार आहे:
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख: आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. या तारखेपूर्वी रिटर्न भरला नाही तर नोटीस येऊ शकते.
यूपीएस पर्याय: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन सिस्टम (UPS) निवडायची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.
भारतीय डाक विभाग: 1 सप्टेंबरपासून नोंदणीकृत डाक सेवा स्पीड पोस्टमध्ये एकत्र करण्यात आली आहे. आता फक्त स्पीड पोस्ट वापरता येणार.
एसबीआय क्रेडिट कार्ड बदल: काही कार्डांवर गेमिंग व सरकारी साईटवरील व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.
विशेष एफडी योजना: इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकने 444, 555 व 700 दिवसांच्या FD योजना जाहीर केल्या असून गुंतवणुकीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे.
गॅस व इंधन दर बदल: दर महिन्याप्रमाणे एलपीजी, सीएनजी, पीएनजी व जेट इंधनाच्या किमतींमध्ये फेरबदल होणार. ऑगस्टमध्ये व्यावसायिक गॅसच्या किमतीत घट झाली होती, मात्र घरगुती सिलेंडरच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही.
