मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांकडून मिळालेली रक्कम परत घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाने स्वतंत्र ‘हेड’ (निधी परतफेड यंत्रणा) तयार केला आहे. यापूर्वी अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने सरकारला पैसे परत घेणे शक्य होत नव्हते. मात्र, आता ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्या महिलांकडून ही रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हि बातमी या योजनेतील एक महत्वाचा नवीन अपडेट आहे. त्यामुळे या योजने पात्र उमेद्वारांनीच आता अर्ज सादर करावेत. त्या आधी योजनेचा पूर्ण तपशील आणि पात्रता अर्जदारानी समजून घेणे आवश्यक आहे. गरजू उमेदवारान पर्यंत योजनेचा लाभ व्यवस्थित पोहचावा आसा सरकारचा उद्देश आहे.
राज्यातील अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतला असला तरी, काही महिला शासनाच्या निकषांमध्ये बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, नमोशक्ती योजना किंवा तत्सम इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे किंवा वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. शासनाने २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार, अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी रक्कम परत करण्यास सुरुवात
या निर्णयानंतर अनेक महिलांनी स्वयंप्रेरणेने पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातच जवळपास ७५,००० महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. अपात्र ठरलेल्या महिलांवर भविष्यात कोणतीही शासकीय कारवाई होऊ नये यासाठी अनेक महिला स्वतःहून पैसे परत करत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यालयांसमोर पैसे परत करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत.
राज्यात एकूण ५ लाख महिला अपात्र
महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यभरात एकूण ५ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये –
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला: २,३०,०००
- वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला: १,१०,०००
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला: १,६०,०००
शासनाचा स्पष्ट संदेश – पात्र महिलांनाच लाभ मिळणार
राज्य सरकारने यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून, अपात्र लाभार्थ्यांकडून निधी परत घेण्यावर भर दिला जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे भविष्यात केवळ पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना पुढील काळात कोणताही अडथळा न येता आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.