शिक्षक भरतीत नवा GR लागू!-New GR for Teacher Recruitment!

New GR for Teacher Recruitment!

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी शासनाने नवीन GR (शासन निर्णय) जारी केला आहे. या निर्णयामुळे शिक्षक पदासाठी अधिक योग्य उमेदवारांची निवड होण्यास मदत होणार आहे.

New GR for Teacher Recruitment!या नव्या पद्धतीनुसार शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीसह उमेदवारांचे गुणांकन करून सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड करणे बंधनकारक राहील. शासनाने दिलेल्या परिशिष्टानुसार ही गुणांकन प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

सुधारित प्रणालीमध्ये एकूण १०० गुणांपैकी जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड होईल. जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील, तर वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. तसेच वयही समान असल्यास बारावीच्या गुणांचा विचार केला जाईल.

ही संपूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली आहे की नाही, याची खातरजमा शिक्षण अधिकारी करतील. या बदलामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.