ईसीएचएस उपचार दरांमध्ये मोठा बदल! माजी सैनिकांसाठी नवी नियमावली लागू! | New ECHS treatment rates implemented!

New ECHS treatment rates implemented!

माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे. ECHS उपचार दरांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, आता सर्व उपचार CGHS दरांप्रमाणे ठरवले जाणार आहेत. हा नवा नियम १५ डिसेंबर २०२५ पासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे.

New ECHS treatment rates implemented!

देशासाठी सेवा केलेल्या लाखो माजी सैनिक कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार आहे. ओपीडी, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, औषधे आणि परतफेड—हे सर्व नवे बदललेले दर लागू करून निश्चित केले जातील. सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कॅशलेस उपचार सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

नवीन नियमांमुळे बिलिंग पद्धती अधिक पारदर्शक आणि एकसंध बनणार आहे. तथापि, “एक देश–एक किंमत” मॉडेल रद्द होत असून, उपचार खर्च आता शहर व रुग्णालयांच्या गुणवत्तेनुसार बदलणार आहे.

शहरांचे वर्गीकरण :

  • टियर-१ शहरांत सामान्य दर लागू
  • टियर-२ शहरांत १०% कमी दर
  • टियर-३ शहरांत २०% कमी दर
    जम्मू-कश्मीर, लडाख, ईशान्य राज्यांना विशेषत: टियर-२ मध्ये समाविष्ट करून दर कमी केले आहेत.

गुणवत्ता मान्यता अनुसार बदल :

  • NABH नसलेली रुग्णालये → १५% कमी दर
  • अत्याधुनिक रुग्णालये → १५% जास्त दर

वॉर्डनुसार शुल्क बदल :

  • सेमी-प्रायव्हेट वॉर्ड → मानक दर
  • जनरल वॉर्ड → ५% कमी
  • प्रायव्हेट वॉर्ड → ५% जास्त

बाह्यरुग्ण सेवा, प्रयोगशाळा चाचण्या आणि डेकेअर प्रक्रियांचे दर सर्वांसाठी समान राहतील. कर्करोग शस्त्रक्रियांचे जुन्या दरांवरच शुल्क राहणार असले तरी केमोथेरपी व रेडिएशनवर नवे दर लागू होतील.

हा निर्णय माजी सैनिकांच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत मोठा बदल घडवणार असून उपचार अधिक सुव्यवस्थित आणि रुग्ण–अनुकूल होणार आहेत.

Comments are closed.