सीएस अभ्यासक्रमात मोठा बदल!-New CS Curriculum Announced!

New CS Curriculum Announced!

कंपनी सेक्रेटरी (CS) अभ्यासक्रमाचा नवा आराखडा जून २०२७ पासून लागू होणार असल्याची माहिती आयसीएसआय (Institute of Company Secretaries of India) चे नवनियुक्त अध्यक्ष पवन चांडक यांनी दिली.

New CS Curriculum Announced!अभ्यासक्रमाच्या काठिण्य पातळीत कोणताही बदल करण्यात येणार नसून, बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम अधिक अद्ययावत ठेवण्यासाठी दर पाच वर्षांऐवजी दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

बारावीनंतर तीन टप्प्यांतून सीएस अभ्यासक्रम पूर्ण करता येतो आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत कमी खर्चात उत्तम करिअर संधी उपलब्ध होतात, असे चांडक यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञान, कायदे व उद्योगातील बदल लक्षात घेऊन सीएस अभ्यासक्रम अधिक उपयुक्त आणि भविष्योन्मुख करण्यावर भर देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सीएसईईटी (CSEET) प्रवेश परीक्षेतही बदल करण्यात आले असून, जून २०२६ पासून ही परीक्षा वर्षातून तीन वेळा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक स्पष्टता, विश्लेषण क्षमता, संवाद कौशल्ये आणि व्यावहारिक समज अधिक मजबूत होईल, असा विश्वास आयसीएसआयने व्यक्त केला आहे.

यासोबतच आयसीएसआयतर्फे विद्यार्थ्यांसाठी मेरीटाइम रेग्युलेशन्स अँड कम्प्लायन्स मॅनेजमेंट या विषयातील पूर्णवेळ एमबीए, विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच हवामान बदल प्रशासन, नवउद्योजक सहाय्य आणि पर्यायी तंटा निवारण (ADR) क्षेत्रातही पुढाकार घेण्यात येणार असल्याचे पवन चांडक यांनी सांगितले.

Comments are closed.