सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयं, संस्थांनी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या संस्थांमध्ये नवा विषय किंवा अभ्यासक्रम सुरू करायचा असल्यास, आता संधी उपलब्ध आहे. विद्यापीठानं नव्या अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे.
विद्यापीठानं काढलेल्या परिपत्रकानुसार, हे प्रस्ताव ३० सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत ऑनलाईन अपलोड करणं आवश्यक आहे. हे अर्ज विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.unipune.ac.in) BOD-BOD online – Colleges/Institutes – Affiliation या लिंकवरून भरायचे आहेत.
प्रस्तावात संबंधित संस्थेच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्कासह, विहित शुल्क व आवश्यक कागदपत्रं जोडणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ज्या संस्था नवं संशोधन केंद्र सुरू करीत आहेत, त्यांना आपला ऑनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर मुळ प्रत देखील विभागात ३० सप्टेंबरपूर्वी सादर करावी लागणार आहे.
हे परिपत्रक उपकुलसचिव सुनीता हजारे यांच्या सहीने संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं असून, महाविद्यालयांसाठी ही एक उत्तम संधी आहे की त्यांनी नव्या अभ्यासक्रमांची जोड आपल्या शिक्षण संस्थांमध्ये द्यावी.

Comments are closed.