राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता गावनिहाय नवीन लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नुकतेच e-KYC पूर्ण केलेल्या तसेच तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेल्या हजारो महिलांची नावे या सुधारित यादीत समाविष्ट करण्यात आली असून, अनेक महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. काही लाभार्थींना मागील थकीत हप्त्यांसह ₹३,००० किंवा ₹४,५०० इतकी एकत्रित रक्कमही मिळत आहे. गावानुसार यादी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in, नारी शक्ती दूत मोबाईल ॲप किंवा थेट ग्रामपंचायत/वॉर्ड कार्यालयातील सूचना फलकाचा उपयोग करता येणार आहे.
महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील, वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या व निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र व बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
यादीत नाव असूनही पैसे जमा होत नसल्यास e-KYC अपूर्ण असण्याची शक्यता आहे. अशा वेळी आधार ओटीपीद्वारे e-KYC पूर्ण करणे व बँकेत आधार सीडिंग करणे गरजेचे आहे. नव्याने अर्ज करायचा असल्यास नारी शक्ती दूत ॲप, अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र किंवा वॉर्ड कार्यालयात मोफत अर्ज करता येणार आहे.

Comments are closed.