आधार अपडेट नियम बदलले!-New Aadhaar Update Rules!

New Aadhaar Update Rules!

जळगाव लाईव्ह न्यूज! आधार कार्डसंदर्भात मोठे बदल लागू होणार आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन नियम जाहीर केले आहेत, जे १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होतील. हे बदल फक्त अपडेट प्रक्रियेला आणि शुल्काला नव्हे, तर आधारवरील महत्त्वाची माहितीही बदलतील.

New Aadhaar Update Rules!१ ऑक्टोबरपासून तुमचे १० वर्षांहून जुने आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य होईल. जुने कार्ड अपडेट न केल्यास अनेक सेवांचा लाभ घेण्यास अडचण येईल.

नवीन शुल्क:

  • नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी – ₹१७५

  • बायोमेट्रिक बदल (फोटो, बोटांचे ठसे) – ₹१२५

  • मुलांसाठी (७ ते १७ वर्षे) बायोमेट्रिक अपडेट – ₹१२५, परंतु ५–७ वर्षे व १५–१७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे शुल्क माफ आहे.

महत्त्वाचे बदल:

  • १८ वर्षांवरील व्यक्तींच्या आधारवर पती/वडिलांचे नाव दिसणार नाही; फक्त UIDAI रेकॉर्डमध्ये राहील.

  • जन्मतारीख आता फक्त वर्ष (उदा. १९९०) दाखवली जाईल; पूर्ण तारीख UIDAI रेकॉर्डमध्ये राहील.

  • आधारवर आता फक्त नाव, वय आणि पत्ता दिसेल.

ही बदल महिलांसाठी गोपनीयतेचे रक्षण करतील आणि आधार अपडेट प्रक्रिया सोपी करतील.

Comments are closed.