NEET UG अर्जाची मुदत वाढली!-NEET UG Application Deadline Extended!

NEET UG Application Deadline Extended!

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET UG 2026 परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने अर्ज भरण्यास ११ मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

NEET UG Application Deadline Extended!यापूर्वी अंतिम मुदत संपल्यानंतरही अनेक विद्यार्थी अर्ज करू शकले नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. इच्छुक विद्यार्थ्यांनी neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

अर्ज केल्यानंतर परीक्षेचे शुल्क ११ मार्च रात्री ११:५० वाजेपर्यंत भरता येणार आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांत NEET परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असून दरवर्षी २० ते २३ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.

Comments are closed.