वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी 2026 संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करताच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 8 मार्च 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
नीट यूजी 2026 परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात येणार असून परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांचा असेल. दरवर्षी देशभरातून 15 ते 20 लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात, मात्र मर्यादित जागांमुळे स्पर्धा अत्यंत तीव्र असते.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ neet.nta.nic.in वर जाऊन “NEET UG 2026 Registration” लिंकद्वारे नोंदणी करावी. सर्व माहिती अचूक भरून अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहे. सामान्य प्रवर्गासाठी ₹1700, EWS/OBC साठी ₹1600, तर SC/ST/PwBD व तृतीयपंथी उमेदवारांसाठी ₹1000 शुल्क आकारले जाणार आहे. परदेशी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹9500 ठेवण्यात आले आहे.
प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राची माहिती व पुढील अपडेटसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवणारी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने अर्ज प्रक्रिया वेळेत आणि काळजीपूर्वक पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.

Comments are closed.