वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षेची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. ८ मार्च २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

अधिकृत माहितीनुसार NEET UG 2026 परीक्षा ३ मे २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत घेतली जाणार असून परीक्षेचा कालावधी ३ तास (१८० मिनिटे) असेल. अर्ज करताना उमेदवारांनी प्रथम वेबसाइटवर नोंदणी करून आवश्यक तपशील अचूक भरून अर्ज सादर करावा आणि त्याची प्रिंटआउट भविष्यासाठी जतन करून ठेवावी.
अर्ज शुल्काबाबतही माहिती जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गासाठी ₹१७००, EWS/OBC साठी ₹१६००, तर SC/ST/PwBD व तृतीयपंथी उमेदवारांसाठी ₹१००० शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परदेशी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹९५०० आहे.
प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र व इतर महत्त्वाच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जाणार असल्याने उमेदवारांनी वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने उमेदवारांनी वेळेत अर्ज करून तयारीला लागणे आवश्यक आहे.

Comments are closed.