NEET PG 2025 परीक्षेचा निकाल येत्या ३ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीनं जाहीर होणार हाय, अशी माहिती राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळा (NBEMS) कडून देण्यात आली हाय.
ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी देशभरातल्या ३०१ शहरातल्या १०५२ केंद्रांवर पार पडली होती. जवळपास २.४२ लाख उमेदवार या परीक्षेसाठी बसले होते.
निकाल natboard.edu.in या अधिकृत वेबसाईटवर PDF फॉर्ममध्ये अपलोड केला जाईल. त्यामध्ये उमेदवारांची रँक, पर्सेंटाइल, आणि रोल नंबर यांसह सगळे तपशील असतील. काही दिवसांनी स्कोअरकार्ड डाऊनलोड लिंकही ऍक्टिव्ह केली जाईल, जिथून उमेदवार लॉगिन करून स्कोअरकार्ड मिळवू शकतील.
तुमचा निकाल कसा बघाल?
natboard.edu.in या वेबसाइटला भेट द्या
NEET PG 2025 Result या लिंकवर क्लिक करा
उघडणाऱ्या PDF फाईलमध्ये तुमचा रोल नंबर, रँक शोधा
पुढे स्कोअरकार्डसाठी लॉगिन करा आणि डाउनलोड करा
या परीक्षेतून काय मिळणार?
NEET PG च्या आधारे उमेदवारांना MD, MS, PG डिप्लोमा, DNB, तसेच ६ वर्षांचे DRNB अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये अखिल भारतीय कोट्यातील ५०%, केंद्रीय विद्यापीठात १००% व ओपन DNB सीट्ससाठी प्रवेश मिळतो.
अधिक माहितीसाठी:
natboard.edu.in

Comments are closed.