पदव्युत्तर वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या नीट परीक्षांच्या संभाव्य तारखा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBEMS) जाहीर केल्या आहेत. यानुसार नीट-पीजी परीक्षा 30 ऑगस्ट, तर नीट-एमडीएस परीक्षा 2 मे रोजी घेण्यात येणार आहे.
या दोन्ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर संगणकाधारित (CBT) पद्धतीने आयोजित केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी सोशल मीडियावरील अफवा टाळून फक्त अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.
नीट-एमडीएससाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, नीट-पीजीसाठी इंटर्नशिपची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षेच्या या तारखा सध्या संभाव्य स्वरूपाच्या असून, सविस्तर माहिती असलेली माहिती पुस्तिका लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती व शंका निरसनासाठी उमेदवारांनी NBEMS च्या अधिकृत पोर्टलला नियमित भेट द्यावी, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.