उणे ४०% गुणांनाही पीजी प्रवेश? NEET PG कट-ऑफ कपातीने देशभर वाद! | NEET PG Cut-Off Reduced Sparks Nationwide Debate!

NEET PG Cut-Off Reduced Sparks Nationwide Debate!

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने NEET PG 2025 साठी क्वालिफायिंग कट-ऑफमध्ये मोठी कपात केल्यानंतर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयानुसार SC, ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना उणे ४० पर्सेंटाइल गुण मिळाले तरीही MS-MDसारख्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकतो. याचबरोबर जनरल आणि EWS प्रवर्गासाठीही कट-ऑफ कमी करण्यात आला आहे.

NEET PG Cut-Off Reduced Sparks Nationwide Debate!

सरकारकडून हा निर्णय पीजी मेडिकल अभ्यासक्रमांतील हजारो रिक्त जागा भरण्यासाठी घेतल्याचे सांगितले जात असले, तरी या धोरणामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.

आतापर्यंत SC, ST आणि OBC उमेदवारांसाठी NEET PG मध्ये किमान ४० पर्सेंटाइल अनिवार्य होता, म्हणजेच ८०० गुणांच्या परीक्षेत सुमारे २३० ते २४० गुण मिळवणे आवश्यक होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हा निकष थेट शून्यपेक्षा खाली आणण्यात आला आहे. त्यामुळे अत्यंत कमी किंवा निगेटिव्ह स्कोअर असलेले उमेदवारही जागा उपलब्ध असल्यास प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा NEET PG 2025 ची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली असून, तिसरी काउंसिलिंग अद्याप सुरू झालेली नाही. अंदाजे ९ हजारांहून अधिक पीजी मेडिकल जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. पात्र उमेदवारांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात असले, तरी अनेक तज्ज्ञ आणि विद्यार्थी संघटनांकडून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.