NEET MDS 2026 अर्ज सुरू!-NEET MDS 2026 Registration Open!

NEET MDS 2026 Registration Open!

दंतवैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET MDS 2026 परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) 14 मार्चपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून इच्छुक उमेदवार 30 मार्च 2026 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

NEET MDS 2026 Registration Open!ही परीक्षा 2 मे 2026 रोजी संगणक आधारित (CBT) पद्धतीने दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल 2 जून 2026 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

या परीक्षेसाठी DCI मान्यताप्राप्त संस्थेतून BDS पदवी घेतलेले उमेदवार पात्र आहेत. तसेच उमेदवारांनी 31 मे 2026 पर्यंत 12 महिन्यांची अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क General/OBC/EWS साठी ₹3500, तर SC/ST/PwD साठी ₹2500 निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.

Comments are closed.