केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (NDA/NA) I – 2026 साठी अधिसूचना जाहीर केली असून, एकूण 394 जागांवर भरती होणार आहे. पुरुष व महिलांना समान संधी देत NDA च्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या 157 व्या कोर्ससाठी तसेच 119 व्या INAC कोर्ससाठी पात्र उमेदवारांची निवड होईल. हा कोर्स 1 जानेवारी 2027 पासून सुरू होईल.

अर्जासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, नौदल व हवाई दलासाठी तसेच INAC 10+2 कॅडेट स्कीमसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) अनिवार्य आहे. 12वी शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र 10 डिसेंबर 2026 पूर्वी पात्रतेचा पुरावा सादर करावा लागेल.
रिक्त पदांचे तपशील:
- आर्मी विंग – 208 (198 पुरुष, 10 महिला)
- नेव्हल विंग – 42 (37 पुरुष, 5 महिला)
- एअर फोर्स फ्लाइंग – 92 (90 पुरुष, 2 महिला)
- एअर फोर्स ग्राउंड ड्युटी – तांत्रिक 18, नॉन-टेक्निकल 10
- INAC 10+2 कॅडेट स्कीम – 24 (21 पुरुष, 3 महिला)
एकूण निवड: 370 पुरुष + 24 महिला = 394 जागा
अर्ज शुल्कामध्ये General/OBC पुरुषांसाठी ₹100, तर SC/ST, सर्व महिला उमेदवार आणि JCO/NCO/OR अवलंबितांसाठी शुल्कमाफी आहे.
पगार व फायदे:
प्रशिक्षणादरम्यान NDA कॅडेटना ₹56,100 मासिक वेतन मिळते. लेफ्टनंट/सब-लेफ्टनंट/फ्लाइंग ऑफिसर पदावरही हाच पगार लागू राहतो. त्यासोबत ₹15,500 लष्करी सेवा वेतन (MSP), महागाई भत्ता, वाहतूक भत्ता, फील्ड भत्ता, गणवेश भत्ता आणि इतर अनेक सुविधा मिळतात.
ही परीक्षा तरुणांसाठी सशस्त्र दलात करिअर करण्याची सुवर्णसंधी मानली जाते.

Comments are closed.