नोकरीची मोठी संधी : ‘एनसीआरटीसी’मध्ये थेट भरती सुरु, विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले! | NCRTC Direct Recruitment Open!

NCRTC Direct Recruitment Open!

0

राज्यातील आणि देशातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि सुवर्णसंधी समोर आली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम लिमिटेड (NCRTC) या प्रतिष्ठित संस्थेमध्ये थेट भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. NCRTC ही दिल्ली-NCR परिसरातील अत्याधुनिक रेल्वे नेटवर्कसाठी कार्यरत एक महत्त्वाची संस्था असून, येथे ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स स्टाफ साठी ७२ पदांची भरती केली जाणार आहे.

नोकरीची मोठी संधी : ‘एनसीआरटीसी’मध्ये थेट भरती सुरु, विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले!

या भरती प्रक्रियेत एकूण ८ वेगवेगळ्या पदांचा समावेश असून ज्युनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल), प्रोग्रामिंग असोसिएट, असिस्टंट (एचआर आणि हॉस्पिटॅलिटी) आणि ज्युनियर मेंटेनर (इलेक्ट्रिकल) अशा पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांच्या तपशीलानुसार पात्रता:
ज्युनियर इंजिनीअर पदांसाठी संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक आहे.
प्रोग्रामिंग असोसिएट साठी आयटी/कॉम्प्युटर सायन्समधील डिप्लोमा, बीसीए किंवा बीएससी आवश्यक.
एचआर असिस्टंट साठी बीबीए/बीबीएम पदवी, तर कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी असिस्टंट साठी हॉटेल मॅनेजमेंट पदवी लागणार आहे.
ज्युनियर मेंटेनर (इलेक्ट्रिकल) साठी आयटीआय (NCVT/SCVT) आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया: सर्व उमेदवारांना प्रथम CBT (Computer Based Test) द्यावा लागेल, त्यानंतर भारतीय रेल्वेच्या मेडिकल मॅन्युअलनुसार वैद्यकीय चाचणी होईल. CBT मध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण आणि कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही.

परीक्षा केंद्र: मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, हैद्राबाद, बेंगलुरू आणि दिल्ली NCR मध्ये असतील.

प्रोबेशन कालावधी – निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल, ज्यामध्ये ऑन-Job ट्रेनिंगही दिले जाईल.

अर्ज शुल्क: सामान्य वर्गासाठी ₹१०००/- + GST आहे. मात्र अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: इच्छुक उमेदवारांनी www.ncrtc.in या संकेतस्थळावर २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज करावा. अर्ज सादर केल्यानंतर मिळालेली पावती सुरक्षित ठेवावी.

संपर्क: भरतीबाबत कुठल्याही शंका असल्यास [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा.
ही एक जबरदस्त संधी असून इच्छुक उमेदवारांनी अर्जाची तयारी त्वरित सुरू करावी!

Leave A Reply

Your email address will not be published.