एनसीईआरटी भरती 2026 अपडेट! गट A, B, C परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! | NCERT Group A B C exam schedule out!

NCERT Group A B C exam schedule out!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT ने गट A, B आणि C पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या भरतीद्वारे एकूण १७० पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८६, ओबीसीसाठी ४४, एससीसाठी १४, एसटीसाठी १८ आणि ईडब्ल्यूएससाठी ११ पदांचा समावेश आहे. एप्रिल २०२६ महिन्यात या परीक्षा विविध केंद्रांवर आयोजित केल्या जाणार आहेत, त्यामुळे उमेदवारांनी तयारीला वेग देण्याची गरज आहे.

NCERT Group A B C exam schedule out!

जाहीर वेळापत्रकानुसार, ज्युनियर अकाउंटंट, कॅमेरामॅन ग्रेड-२, इंजिनिअरिंग असिस्टंट, प्रोफेशनल असिस्टंट, सिनियर अकाउंटंट, प्रोडक्शन असिस्टंट आणि स्क्रिप्ट रायटर या पदांसाठी परीक्षा २७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. त्यानंतर स्टोअर्स ऑफिसर आणि असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-A पदांसाठी परीक्षा २८ एप्रिल रोजी आयोजित केली जाईल, तर असिस्टंट पब्लिक रिलेशन्स ऑफिसर पदाची परीक्षा २९ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांनी या परीक्षांसाठी नोंदणी केली आहे, त्यांची प्रवेशपत्रे (Admit Card) लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी NCERT च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in ला भेट देऊन ‘Admit Card’ विभागात जावे. त्यानंतर “NCERT Group A B C Admit Card 2026” या लिंकवर क्लिक करून आपले लॉगिन तपशील (Login Credentials) भरावेत. त्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंट काढणे आवश्यक आहे.

ही भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असून, इच्छुक उमेदवारांनी वेळापत्रकानुसार नियोजन करून परीक्षेची तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Comments are closed.