कन्नड येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयातर्फे इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ५२ परीक्षा केंद्रांवर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत घेण्यात येईल.

ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्यांनी आपले हॉल तिकीट https://cbseitms.rcil.gov.in/nvs
या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड (जन्मतारीख) वापरून तातडीने डाउनलोड करून घ्यावे. त्यानंतर हॉलतिकीटची प्रिंटआउट काढणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या दिवशी — १३ डिसेंबर
- हॉल तिकीट
- आधार कार्डची झेरॉक्स
ही दोन्ही कागदपत्रे परीक्षा केंद्रावर आणणे बंधनकारक आहे, अशी माहिती प्राचार्य भूलन सरोज तसेच परीक्षा संयोजक शिवनारायण वानखेडे आणि अनिल घोंगे यांनी दिली.

Comments are closed.