राष्ट्रीय पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप (N-PDF): तरुण संशोधकांसाठी सुवर्णसंधी! | National Post Doctoral Fellowship: Opportunity for Researchers!

National Post Doctoral Fellowship: Opportunity for Researchers!

ANRF अंतर्गत राबवली जाणारी National Post Doctoral Fellowship (N-PDF) ही योजना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य संशोधनासाठी प्रेरित तरुण संशोधकांना ओळखून त्यांना संशोधनासाठी आर्थिक व शैक्षणिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

National Post Doctoral Fellowship: Opportunity for Researchers!

या फेलोशिपअंतर्गत निवडलेले संशोधक अनुभवी मेंटॉरच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करतील आणि भविष्यात स्वतंत्र संशोधक म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक अनुभव व व्यासपीठ मिळवतील. ही फेलोशिप फक्त भारतातच लागू असून मान्यताप्राप्त विद्यापीठे, राष्ट्रीय प्रयोगशाळा व संशोधन संस्थांमध्ये राबवता येते.

फेलोशिपचा कालावधी २ वर्षांचा असून ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांनी ३ महिन्यांच्या आत संस्थेत रुजू होणे बंधनकारक आहे. संस्थेचा किंवा मेंटॉरचा बदल निवडीनंतर मान्य केला जाणार नाही. संशोधन अनुदानाचा वापर लहान उपकरणे, उपभोग्य साहित्य, आकस्मिक खर्च व देशांतर्गत प्रवासासाठी करता येईल; मात्र अतिरिक्त संशोधन कर्मचारी देण्याची तरतूद नाही.

या फेलोशिपसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा, त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph.D./M.D./M.S. पदवी असावी (थीसिस सादर केलेले पण पदवी न मिळालेले उमेदवारही पात्र; मात्र त्यांना कमी फेलोशिप मिळेल) आणि किमान २ संशोधन लेख प्रकाशित असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा ३५ वर्षे असून SC/ST/OBC, दिव्यांग व महिला उमेदवारांना ५ वर्षांची सवलत आहे. Ph.D. व्हायव्हानंतर ५ वर्षांच्या आतच N-PDF साठी अर्ज करता येतो आणि ही फेलोशिप आयुष्यात फक्त एकदाच मिळू शकते. मेंटॉर हा भारतातील मान्यताप्राप्त संस्थेत नियमित शैक्षणिक/संशोधन पदावर कार्यरत व Ph.D. धारक असावा. उमेदवार स्वतःच्या Ph.D. मार्गदर्शकाशी किंवा त्याच विभाग/संस्थेत ही फेलोशिप घेऊ शकत नाही.

फेलोशिप रक्कम: पात्र उमेदवारांना ₹80,000 प्रति महिना + HRA, तर थीसिस सादर केलेल्या पण पदवी न मिळालेल्या उमेदवारांना ₹50,000 प्रति महिना + HRA दिले जाते. याशिवाय संशोधन अनुदान म्हणून ₹2,00,000 प्रति वर्ष आणि प्रवास/आकस्मिक खर्चासाठी ₹1,00,000 प्रति वर्ष दिले जाते. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ANRF च्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून संपूर्ण माहिती, संशोधन प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

Comments are closed.