Nashik City Police आयुक्तालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह विभागाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तयारी सुरू केल्यानंतर आयुक्तालयाने संबंधितांकडून अर्ज मागवले आहेत.
मात्र यंदा वाहतूक, गुन्हे शाखा आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये नियुक्तीसाठी ‘वेटिंग’ ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी Kumbh Mela (सिंहस्थ) पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे १५ पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ पूर्ण करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण बदल्यांमध्ये पोलिस ठाण्यांना पसंती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळण्याचे संकेत आहेत.
दरम्यान, वाहतूक विभाग, गुन्हे शाखा आणि विशेष पथकांमध्ये बदली मिळवण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. तसेच अनेक अधिकारी-कर्मचारी सध्या बढतीच्या प्रतीक्षेत असल्याने या बदल्यांकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.