नाशिक मनपाची मोठी वैद्यकीय भरती!-Nashik NMC Launches Major Medical Recruitment!

Nashik NMC Launches Major Medical Recruitment!

नाशिक महानगरपालिकेने वैद्यकीय सेवांवरील वाढता ताण लक्षात घेऊन ७३ मानधनाधिष्ठित पदांची भरती जाहीर केली आहे. वैद्यकीय विभागात एकूण ९३४ मंजूर पदांपैकी फक्त ३२९ पदे कार्यरत असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी टंचाई भासत आहे.

Nashik NMC Launches Major Medical Recruitment!

आगामी सिंहस्थ, वाढती लोकसंख्या आणि विस्तारत्या शहरामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला असून, तज्ज्ञ डॉक्टर मिळण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने मानधन वाढवून भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

सध्या विभागात १४२ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, ईएनटी, नेत्रतज्ज्ञ अशा महत्त्वाच्या पदांची कमतरता जाणवत आहे.

महापालिकेच्या अखत्यारीत पाच रुग्णालये, ३० शहरी आरोग्य केंद्रे आणि नवीन सुरू होणारी १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच २५ ‘आपला दवाखाना’ केंद्रे असल्याने मनुष्यबळ वाढविणे अत्यावश्यक झाले आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

Comments are closed.