नाशिक महापालिकेत फायरमन व चालक पदांची भरती सुरू! १८६ जागांसाठी अर्ज मागवले! | Nashik Municipal Corp Hiring 186 Firemen & Drivers!

Nashik Municipal Corp Hiring 186 Firemen & Drivers!

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात अभियंत्यांच्या ११४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आता अग्निशमन विभागातील फायरमन आणि चालक-यंत्रचालक पदांसाठी १८६ जागा भरण्यात येणार आहेत.

Nashik Municipal Corp Hiring 186 Firemen & Drivers!

ही भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत राबवली जाणार आहे. यासंदर्भातील जाहिरात बुधवारी (दि. ५) प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना १० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

भरतीची प्रमुख माहिती

  • एकूण जागा: १८६
    फायरमन: १५० पदे
    चालक-यंत्रचालक: ३६ पदे
  • भरती प्रक्रिया: टीसीएसमार्फत ऑनलाइन
  • अर्ज सुरू: १० नोव्हेंबरपासून

शासनाची विशेष परवानगी
महापालिकेचा आस्थापना खर्च ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे पदभरतीला पूर्वी मंजुरी मिळत नव्हती. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही अट शिथिल करत अग्निशमन व तांत्रिक संवर्गातील भरतीला हिरवा कंदील दिला आहे.

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टानुसार १९९५ मध्ये ७,७२५ पदे मंजूर होती, परंतु आज जवळपास निम्मी पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती आणि रिक्त जागांमुळे रिक्त आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार पडला आहे.

ही भरती झाल्याने अग्निशमन विभागातील मनुष्यबळ वाढणार, तसेच सिंहस्थाच्या काळात सुरक्षेची आणि तात्काळ प्रतिसादाची तयारी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.