नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने ७६ नवीन पदांची मान्यता दिलीय. या भरतीतून अनेकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पदांची विभागणी अशी आहे —
- ५२ पदे नियमित
- २४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे
नियुक्ती मार्ग —
- नियमित पदे: शासकीय सेवा नियमांनुसार
- प्रतिनियुक्ती/निवृत्त अधिकाऱ्यांद्वारे काही पदे
- कंत्राटी पदे: थेट जाहिरात किंवा मान्यताप्राप्त संस्थांमार्फत
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे पूर्णवेळ आयुक्त म्हणून माजी पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंग यांनी पदभार स्वीकारला आहे. तसेच, मुंबई मंत्रालयात स्वतंत्र ‘कुंभमेळा कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे, जे प्रशासकीय कामे अधिक गतिमान आणि समन्वयपूर्वक पार पाडेल.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायद्याच्या आधारे प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, नवीन पदनिर्मिती मंजूर झाल्याने अधिकारी-कर्मचारी वर्गाची कमतरता पूर्ण होणार आहे.